ज्ञानेश्वर म. वाघमारे/लोणावळा: सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तीक यांची आणखी एक दमदार कामगिरी; पाच वर्ष जुन्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. श्री सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली होती की, लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथे सन २०१९ मध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजिं न. १५३/१९ भादवि कलम ३९५, १२०(ब) या दरोड्याच्या गुन्ह्यात मागील पाच वर्षांपासून फरार असलेला एक आरोपी हा लोणावळा रेल्वे मैदान परिसरात येणार आहे. त्याआधारे श्री सत्यासाई कार्तिक व त्यांचे पथक हे आज दिनांक ०१/०३/२०२४ रोजी सकाळपासूनच लोणावळा रेल्वे मैदान परिसरात सापळा रचून बसलेले असताना दुपारी १६.०० वाजताच्या सुमारास आरोपी मतीन शेख हा तिथे येताच व खबरीने त्याची ओळख पटविताच पथकाने त्यास जागीच ताब्यात घेतले व त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याचे पूर्ण नाव मतीन रशीद शेख, वय ३८ वर्ष, राहणार पुणे, असे सांगून तो लोणावळा शहर पोलिस स्टेशन गु. रजि न.१५३/१९ भादविं कलम ३९५, १२०(ब) मधील फरारी आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून नमूद आरोपीस पुढील कार्यवाही करीता लोणावळा शहर पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा बंटी कवडे, पो.हवा सचिन गायकवाड, पो.कॉ रहिस मुलानी, पो कॉ.गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.
