मावळ नाहीतर संपुर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना म्हणजे दिनांक ०२/०८/२०२२ रोजी कोथुर्ण ता. मावळ जि. पुणे येथे एका सात वर्षीय चिमुकल्या बालीकेवर बलात्कार करून तिचा खुन करणेत आला होता. शिवछत्रपतींचा इतिहास असलेल्या मावळच्या भुमीत यापूर्वी अशी घृणास्पद घटना कधीच घडलेली नव्हती म्हणून सदर घटनेबाबत लोकांच्या मनात तिव्र संताप होता. त्यामुळे पोलीसांसमोर सदर गुन्हयातील आरोपी शोधण्याचे मोठे आवाहन होते. अशा वेळी कामशेत पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी वरिष्ठांचे सुचनाप्रमाणे तपास करुन चोवीस तासाच्या आत गुन्हयातील मुख्य आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी यास जेलबंद केले होते. सदर आरोपीस फाशीची शिक्षा मिळावी याकरीता लोकांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन व मोर्च निघत होते. त्यामुळे गुरुयाचा सखोल तपास करुन आरोपीला फाशीची शिक्षा लावण्याचे पोलीसांसमोर मोठे आवाहन होते. अशा वेळी गुन्हयाचे तपासी अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी वरिष्ठांचे सुचनाप्रमाणे सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन मुख्य आरोपी याने सदरचा गुन्हा केल्यानंतर त्यास पुरावा नष्ट करण्याकरीता मदत करणारी त्याची आई सुजाता महिपती दळवी हिला निष्पन्न केले होते. सदर गुन्हयाचा तपास करुन पोलीसांकडून दोन्ही आरोपीविरुध्द मा. न्यायालयात जवळपास एकक हजार पानाचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर सदर गुन्हा हा फास्ट ट्रक मध्ये चालविण्याकरीता पोलीसांकडुन प्रयत्न करण्यात आले. त्याप्रमाणे सदरची केस ही मा. श्री बी. पी. क्षीरसागर सोो, अति. सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांचे कोर्टात सुरु होती. सदर केसमध्ये पोलीसांकडुन आरोपीविरुध्द सादर पुराव्यावरुन दिनांक २२/०३/२०२४ रोजी मा. न्यायालयाने गुन्हयातील मुख्य आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी यास १) भादवि क. ३७६ (AB), ३७६ (A), व पोस्को क. ६ प्रमाणे फाशी २) भादवि क. ३७६ (२) खाली जन्मठेप व दहा हजार रुपये दंड ३) भादवि क. ३०२ खाली फाशी व दहा हजार रुपये दंड ४) भादवि क. ३६३ खाली सात वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंड ५) पोक्सो क. ४ नुसार जन्मठेप व वीस हजार रुपये दंड तर आरोपी सुनिता महिपत दळवी हिस भादवि कलम २०१ खाली सात वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड ६) पोक्सो क. २१ अन्वये सहा महिने साधा कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
गुन्हयातील दोन्ही आरोपीना मा. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमुळे मावळच्या लेकीला न्याय मिळाला असुन त्याबाबत सामान्य लोकांकडून कामशेत पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमंलदार यांचे कौतुक होत आहे. सदर गुन्हयाचा तपास हा कामशेत पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय जगताप, यांनी केला असुन त्यामध्ये त्यांना सहा. पोलीस निरीक्षक, आकाश पवार, पोसई शुभम चव्हाण, प्रियांका माने, सुरेखा शिंदे, सहा. फौजदार अजय दरेकर, समीर शेख, पो. हवा. रविंद्र राय, जितेंद्र दिक्षीत, गणेश तावरे, पो. ना. हिप्परकर, विरणक, गवारी पो. कॉ. अशिष झगडे यांनी मोलाची कामगिरी केली आहे. सदर केस ही मा. न्यायालयात चालविण्याकरीता मा. सत्यसाई कार्तिक सोा, सहा. पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग लोणावळा यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रविंद पाटील यांनी केस अधिकारी म्हणुन तर पो. हवा. जितेंद्र दिक्षीत यांनी पैरवी अधिकारी म्हणुन काम पाहीले आहे.
