ज्ञानेश्वर म. वाघमारे/मावळ: तालुक्यातील कचरेवाडी येथील युवा कीर्तनकार ह.भ.प. गोपीचंद महाराज कचरे यांना वारकरी संप्रदायातील उल्लेखनिय कार्याबदल सद्गुरु अडाणेश्वर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले . शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह, ज्ञानेश्वरी, अडाणेश्वर महात्म्य तसेच तुळस देवून सन्मानित करण्यात आले. रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सुमंत पॅलेस वरसोली या ठिकाणी सन्मान सोहळा पार पडला. पुरस्काराला उत्तर देताना सद्गुरु हे परिसासारखे असतात,ज्या प्रमाणे परिसाच्या संगतीत लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे सद्गुरुच्या संगतीत शिष्याच्या आयुष्याचे सोने होते, परंतु सद्गुरु वचनावर ठाम विश्वास असावा लागतो. असे विचार कचरे महाराज यांनी व्यक्त केले .
