ज्ञानेश्वर म. वाघमारे/सासवड शहर :- पुरंदर तालुका वंचित बहुजन आघाडीची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी श्याम मोहन माने व महासचिव पदी सुरज आत्तार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे व कार्यकारणीचे राष्ट्रीय पत्र राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी दिले.कार्यकारणी पुढीलप्रमाणे :- महासचिवपदी – सुरज आत्तार उपाध्यक्ष – विकास जगताप,प्रसाद जगताप, अनिल धिवार,सचिव – विकास सोनवणे,संघटक – समीर नेटके, अजय भोसले, प्रवक्ते – विनोद शेगर,कोंडीबा कांबळे,प्रसिद्धीप्रमुख – स्वप्निल भोसले,सुमित साबळे,खजिनदार -नवनाथ लोखंडे,अविनाश सोनवणे,संपर्कप्रमुख -सचिन जगताप,सल्लागार -पारितोषिक मगरे,निरीक्षक -जयपाल यादव,सदस्य – नितीन माने. पुरंदर तालुक्यातील सर्व घटकांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडी काम करणार असल्याचे नवनियुक्त माने यांनी सांगितले.
